Saturday 14 September 2019

हे असच चालायचं

आज किनाऱ्यावर तुझी मूर्ती दिसली, म्हंटल पटकन जाऊन उचलावी इतक्यात महानगरपालिकेच्या लोकांनी उचलून कचऱ्यात टाकली😒.
दहा दिवस सिंहासनावर बसलेला तू अकराव्या दिवशी कचऱ्यात दिसला😑. इथे तुझी ही गत🙄 तर आम्ही तर अगदी साधी माणसे!

हे असच चालायचं!😉
©Neha R Dhole

Friday 13 September 2019

प्रिय बाप्पास



  काल तु आम्हाला सोडून गेलास, खर तर कुठे हे तुला कसे विचारावे हाच प्रश्न आहे. कारण संपुर्ण पृथ्वीवर अधिराज्य गाजविणारा तू, आम्हीच तुझ्या आश्रयाला आलेलो आणि तरीही आम्ही तुला कसे विसर्जित करतो ? हा मला नेहमी पडत आलेला प्रश्न पण असो, तू गेले दहा दिवस आमच्यासोबत राहिला आणि काल गेला. पण तुला पुढच्या वर्षीसाठी काही सूचना. पहिली एक तर लवकर ये!दुसरी आणि जातांना ना ते दहा दिवसांच चैतन्य मात्र नेवू नको ते इथेच ठेवून जात जा! आणि खर तर टिळकांनी ज्या कामासाठी तुझी निवड केली तरी ती म्हणजे सार्वजनिक एकात्मता ती मात्र नांदू दे! बस्स इतक्या सूचना खूप!
       तुला माहिती आहे का ? म्हणजे माहितीच असणार आम्ही फार व्हर्चुअल झालोय सध्या, सगळं कस एका क्लीक वर असत आमच पण तुझ्या साठी नाही बरका! अजूनही आम्ही तुझ्या दर्शनाला रांगेतच उभ राहतो. जगात सगळ्या गोष्टींसाठी आमच्या कडे वेळ नाही पण बाप्पाच्या दर्शनाला आम्ही वेळ काढू. पण तू फार लकी आहेस! माहिती आहे का? कारण हल्ली आम्हाला कुणासाठीही वेळ नाही म्हणणारे आम्ही काल गेले दहा दिवस सतत तुझ्या सेवेत आणि कालचा जल्लोष बघून तर तुलाही कळलं असेल की इतर सगळ्या गोष्टी विसरून तुझ्या साठी सगळे एकत्र आले. छान वाटल पाहून. पण असेच नेहमी एकत्र येवू दे! अशी सगळ्यांना बुद्धी दे. खर तर निरोपाची वेळ ही कुणालाच नको असते पण त्यातही तुझी निरोपाची तऱ्हाच वेगळी निरोपही किती उत्साही असू शकतो हे तुझ्या निरोपाच्या वेळी कळत.
         ह्या दहा दिवसांमध्ये आम्ही काही चुकलो असलो तर शिक्षा दे, माफी नको म्हणजे पुन्हा चुका घडणार नाही. आणि तसा तुला आमच्या कडून बराच त्रास झाला असेल, खूप लोकांनी खूप गाऱ्हाणे सांगितले असतील, पण तरीही तू पुढच्या वर्षी लवकर यायचं! आणि तू येणार कारण आमच्यापेक्षाही तुझं आमच्या वर जास्त प्रेम आहे आणि ते असच टिकवून ठेव! चल मग भेटत जाऊ अधून मधून मंदिरात........!
                                                 
©Neha R Dhole.