आपण आयुष्यात ठरवलेलं कधी काही होत का..? नाही, आणि माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर अजिबात नाही. इतकं शहाणपणाचं जगून कधी समाधान मिळत का...? मग थोडंस वेड होऊन जगायला काय हरकत आहे..?. घड्याळ्याच्या वेळा पाळता पाळता नेहमीच आयुष्याच्या वेळा चुकत जातात. दुसऱ्यांच्या चुका काढता काढता ,स्वतः च्या चुका मात्र लपत जातात! . थोडसं अपेक्षेचं ओझं कमी करून , एकदा आरशात बघावं इतरांकडून अपेक्षा ठेवताना आपण त्या किती पूर्ण करू शकतो त्याचा कधीतरी ताळेबंद मांडुन पहावा. मला वाटतं जगण्यातले अर्धे प्रश्न तिथेच सुटतील. आरश्यातल्या प्रतिबिंबाकडे पाहुन अभिमानाने म्हणता आलं पाहिजे, "आतापर्यंत आयुष्यात भेटलेला सर्वोत्तम माणुस तुच! " . चला मग प्रयत्न करूया इतरांच्या गर्दीमध्ये जाऊन हरवण्यापेक्षा, स्वतःला शोधलं तर काय हरकत आहे..? . ©Neha R Dhole.
No comments:
Post a Comment