Monday 20 April 2020

पत्र एका युगपुरुषाशास

आदरणीय स्वामीजी,

स्वामीजी, तुम्हांला पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ काय , पण आपण तर नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतो फक्त पत्रव्यवहाराची ही वेळ पहिलीच. लहानपनापासून  तुम्ही मला पुस्तकांच्या माध्यमातुन भेटायला येत होतात, अगदी ज्याच्या डोक्यावर आई थंड पाणी ओतायची त्या बिले पासुन तर तुमच्यातला तो निर्भय, साहसी पण परिस्थिती ने खचून गेलेला नरेंद्र पण मला खुप जवळचा वाटला. कालीमतेला जाऊन मला ज्ञानदे वैराग्यदे , म्हणणारा नरेंद्र पुन्हा होणे नाही. पण तुमची खरी ओळख म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि त्यातही काही लोक  धर्मपरिषदेत माझ्या बंधुनो आणि भगिनींनो म्हणुन संबोधले म्हणूनच ओळखतात.असो, तो आपला विषय नाही. तुम्हाला त्या लोकांची किवच येत असणार.
          165 वर्षांपूर्वी तुम्ही इथे जन्माला आला. तुमचं आयुष्य अवघ 39 वर्षे. त्यात 9 वर्ष सतत प्रवास. का केला तुम्ही इतका प्रवास का फिरलात जगभर..? कारण आपल्या संस्कृतीच्या प्रचारासाठी. तुम्ही आपल्या भारतीय संस्कृतीला जननी म्हणून संबोधल. तुम्ही 165 वर्षांपुर्वी सांगत होता माझा देश काय आहे. आपले वेद काय आहेत. आणि तेव्हा विदेशातल्या त्या लोकांना ते पटलं.  भगवा वस्त्र परिधान करून ज्यांनी लोकांना आपला धर्म पटवून दिला.  तुम्ही त्या काळी नेहमी म्हणायचा मी भारताला लगेच स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. पण तुम्हाला ते टिकविता येणार नाही. किती दूरदृष्टी, असा योगी भारतासारख्या देशात जन्माला येतो, पण आम्ही काय करतो तर तुमची शिकवण आचरणात आणत नाही. पण हल्ली आणि आम्ही आमचे मुळंच विसरलो. तुम्हांला माहिती आहे का..? माहितीच असणार , सध्या जगभर कोरोना धुमाकूळ घालतोय. त्याने अक्षरशः सगळ्यांना घरात बंदिस्त करून ठेवलंय. पण ह्या कोरोनाने पुन्हा जगात एक गोष्ट सिद्ध केली. की आपली भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे, आज पुन्हा सगळे भारतीय संस्कृती कडेच वळतात आहे.  आपल्या संस्कृतीला निरर्थक किंवा पोकळ म्हणणाऱ्या आपल्याच लोकांना ही चांगलीच चपराक आहे. जे तुम्ही पटवून देण्याचा प्रयत्न केला, आज 150 वर्षांनी ते लोकांना पटलं. खरच तुमच्या दूरदृष्टीला सलाम ! भारत महासत्ता होण्याचं तुमचं स्वप्न नक्कीच आता पूर्ण होणार!
          तुम्ही काय मागितलं होत फक्त शंभर युवक , आज माहिती नाही तुम्हाला मिळतील की नाही , तुम्ही आज साहित्यरूपी आमच्यातच आहात, पण हे साहित्य वाचणाऱ्याचा एक ठराविक  वाचकच आहे. तुम्ही काय होतात हे वाचल्याशिवाय कळणार नाही, आणि खंत म्हणजे तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात शिकवल्या जात नाही. आम्हाला तो इतिहास शिकवल्या जातो ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, आम्हाला लेनिन शिकवतात, हिटलर शिकवतात पण विकेकानंद  नाही. तुम्हाला त्या गोष्टींचा फरक पडत नाही.तुम्ही नेहमीच सांगत आला आहात, आपण फक्त आपलं कर्तव्य करायच. स्वामीजी तुम्ही म्हणजे तारुण्याचा उत्स्फूर्त झराच आहे. देशाचा तरुण कसा असावा तुमच्या सारखा, पण इथे आदर्शांबद्दल मी मौन बाळगलेलच बर. पण तुमच्या सारख्या निर्भीड, साहसी एका युगपुरुषाची सध्या खूप गरज आहे. मी पुन्हा जन्म घ्या म्हणणार नाही कारण तुम्ही आमच्यासाठी  चिरंजीवीच आहात. आणि जसं की तुम्ही म्हणाला होता की आपली संस्कृती हे जीवन कसं जगायचं हेच शिकवते, आता हे 150 वर्षांनंतर जगाला पटण्याची वेळ आली आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे  इकडे तर कोरोनाचा हाहाकार चालु आहे, पण नक्कीच तुम्ही सांगितलं तस विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ घालणारी आपली संस्कृती असल्यामुळे त्यातुन लवकर बाहेर पडु आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल हीच अपेक्षा.
                                                तुमचीच शिष्या,
                                                   नेहा.
©Neha R Dhole.


No comments:

Post a Comment